शरद पवार आज  फेसबुक पेजवरून जनतेशी संवाद साधणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाभयानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण व्हावी,त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्या फेसबुक पेजवर आज २७ मार्च रोजी  रोजी सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान लाईव्हच्या माध्यमातुन संवाद साधत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.राज्यातील कोरोना रूग्णांची आणि उपाय योजनांची माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सकाळी ११ वाजता फेसबुकच्या माध्यमातुन राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा आव्हानांबाबत शरद पवार आपल्या फेसबुक पेजवर बोलणार आहेत.

 

 

 

Previous articleलॉक डाउनच्या काळात दारु विक्री करणा-यांवर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई
Next articleकर्जदारांना मोठा दिलासा; कर्जाचे हप्ते आणि वसूलीला तीन महिने स्थगिती !