गरजूंना तीन महिन्याचे धान्य मोफत मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोरोना संकटामुळे  आणि राज्यात लॉक डाऊनची परिस्थिती असल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेला महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला असून,गरीब आणि गरजू जनतेसह रेशन कार्ड नसणा-यांनाही रेशन दुकानातून तीन महिन्याचे धान्य मोफत मिळणार आहे.राज्य सरकारने आज संबंघित दुकानाची  आणि मोबाईल नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे.

सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने हातावर पोट असणा-यांची काळजी राज्य सरकार करेल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिली होती त्यानुसार आता अडचणीच्या काळात गरीब आणि गरजू जनतेच्या  अडचणीसाठी धावून गेले आहे.गरीब व गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील रेशन दुकानांची यादी मोबाईल नंबरसह देण्यात आली आहे. शिवाय रेशनकार्ड नसणा-यांनाही सध्याच्या लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येवू नये म्हणून रेशन दुकानात एक फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.तो भरून दिल्यास संबंधित व्यक्तीलाही  तीन महिन्याचे धान्य देण्यात येणार आहे. हा लाभ गरजूंना मिळावा यासाठी  रेशन दुकानाची मोबाईल नंबरसह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Previous articleबोरिवली दहिसर मध्ये दररोज ६ हजार गरजूंना मोफत भोजन
Next articleसूचनांचे पालन करा अन्यथा पुढच्या पिढीला  किंमत मोजावी लागेल :  शरद पवार