सावधान : राज्यात  एका दिवसात कोरोनाचे ८२ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज राज्यात एकूण ८२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत,१३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत.

राज्याची काळजी वाढवणारी बातमी आहे.आज राज्यात एकूण ८२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून,यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३३१ नमुन्यांपैकी ५७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ करोना बाधितना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.सध्या राज्यात २३ हजार ९१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Previous articleवेतन दोन टप्यात देणार; कुणाच्याही वेतनात कपात नाही : उपमुख्यमंत्री
Next articleसरकारचा मोठा निर्णय : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच वस्तू मिळणार