मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असताना पश्चिम उपनगरात दहिसर- बोरिवली,कांदिवली परिसरातील नाका कामगार,बांधकाम कामगार, मजूर, हातावर पोट असणारे यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये या कारणास्तव या परिसरात तीन किचन सेवा सुरु करण्यात आली आहे. दर दिवशी सुमारे ६ हजार जणांना किचन सेवेच्या माध्यमातून भोजन देण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने गेल्या सहा दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या या मोफत सेवेचा हजारोंना लाभ मिळत आहे.
बोरिवली-कांदिवली-दहिसर परिसरातील नाका कामगार,बांधकाम कामगार मजूर,ज्येष्ठ नागरिक,अपंग,हातावर पोट असणारे, पोलिस,वाहतूक पोलिस, किचन सेवा सुरु करण्यात आलेली आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने गेल्या सहा दिवसांपासून रावळपाडा, अशोकवन, फुलपाखरु उद्यान- टाटा पॉवर हाऊस. सुमारे ९० कार्यकर्ते तीन मिनी टेम्पोच्या माध्यमातून भोजन वितरणाचे काम करित आहेत.त्याचप्रमाणे पोलिस व तहसीलदारांच्या विनंतीनुसार गरजूंनाही या सेवेचा लाभ देण्यात येत आहे. दर दिवशी एपीएमसी मार्केट मधून भाजीचा एक ट्रक बोरिवली मध्ये बोलावला जायचा.आता शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर माळशिरस, नेवासा आदी ठिकाणच्या शेतक-यांनी भाजीचे ट्रक पाठविले आहेत, त्या भाजीपाल्याचे या ठिकाणी नियोजन पध्दतीने वाटप करण्यात येत आहेत, तर शेतक-यांना नगदी स्वरुपात त्यांच्या भाजीची किंमत देण्यात येत आहे. ही सर्व वितरण व्यवस्था कुठेही गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात येत आहे.