मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक असताना,लॉकडाऊनच्या काळात सरकारने दिवाण बंधू अर्थातच वाधवान बंधूना विशिष्ठ सुविधा दिल्याचे उघडकीस आले.या प्रकरणी कारवाई करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रधान सचिव अमिताभ कुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.मात्र सचिवांना दिलेली सक्तीची रजा ही निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप करत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
वाधवान बंधूवर पीएमसी,एस बॅक घोटाळ्याचे आरोप असून, त्यांच्यावर सीबीआय, ईडी आणि मुंबई पोलिसांकडून गुन्हे दखल करण्यात आले आहेत.सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असताना वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी पोलिसांना सहकार्य न करता वाधवान यांना मदत केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. वाधवान बंधूना देण्यात आलेल्या या विशिष्ठ सुविधा प्रकरणी सोमैया यांनी मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.गुन्हेगारी आणि फरारी वाधवान बंधूंना संरक्षण दिल्याप्रकरणी अमिताभ यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा तसेच वाधवान बंधूंना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. आयपीएस अधिकारी आणि गृहसचिव अमिताभ यांनी भगेडों को भगाने के लिए केलेल्या सहकार्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. गुप्ता यांना दिलेली सक्तीची रजा ही निव्वळ धुळफेक असून,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.