किरीट सोमैय्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमैय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचे पक्षाने तिकीट कापले होते. त्यामुळे किरीट सोमैय्या यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.

वाधवान प्रकरणी  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.मात्र भाजपाचे नेते किरीट सोमैय्या ज्यापध्दतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचे आहे असा टोला मलिक यांनी लगावला आहे.आयएएस, आयपीएस अधिकारी पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन येतात. त्यामुळे केंद्राला वाटत असेल तर ते कारवाई करू शकतात असेही  मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleवाधवानचे भाजपाशीच आर्थिक लागेबांधे ;पत्रामागेही भाजपाचाच मास्टरमाईंड !
Next articleलॉकडाऊन अधिक कडक करणार; परीक्षांचा निर्णय मंगळवारी घेणार