मुंबई नगरी टीम
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वत: ला १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतल्याने ते सध्या घरी बसूनच कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींची मदत करीत आहेत.त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अनेक राजकीय व्यक्तींचे फोन खणखणत आहेत. मात्र काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आव्हाड यांना फोन कोला.
काल अचानक साहेबांचा फोन आला.आवाजामध्ये माया,आपलेपणा,काळजी हे सगळं जाणवत होतं.जितेंद्र कसा आहेस… मी म्हटल साहेब सगळ ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हटलं साहेब ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत.पण, साहेब तुम्ही दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आता तर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही. असे संभाषण जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या मध्ये झाले…पवार यांचा फोन वेगळीच जादू करून गेला असे आव्हाड यांनी सांगितले.