दिवसभरात कोरोनाचे २३२  नवीन रुग्ण;रूग्णांची संख्या २९१६ वर पोहचली

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधीत २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली असल्यामुले राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या २ हजार ९१६ वर पोहचली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून,आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २ हजार ९१६  जण पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५ हजार ६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे.  त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह,उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ झाली आहे.

Previous articleउद्धवा… काही नतद्रष्टांनी,तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय !
Next articleमुंबई-पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय