लॉकडाऊन कालावधीत ६० हजार गुन्हे दाखल तर १३ हजार व्यक्तींना अटक

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत राज्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण ६० हजार गुन्हे दाखल झाले आहेत तर १३ हजार ३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१ हजार ७६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७५ हाजर ११५ व्यक्तींनी विविध कारणास्तव फोन केले आहेत.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंनटाईनचा  शिक्का मारला आहे,अशा ५८९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ३० लाख(२ कोटी ३० लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस कर्मचारी अधिकारी  दिवस-रात्र  कार्यरत आहेत . मात्र दुर्दैवाने या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १२१ घटनांची नोंद  झाली असून  यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Previous articleजागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवायचा असेल तर बेजबाबदारपणे वागू नका
Next articleरोहित पवार संतापले…!   संकटात भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय