लॉकडाऊनच्या काळात ८३ हजार गुन्हे दाखल; १६ हजार ८९७ जणांना अटक

मुंबई नगरी टीम

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २८एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार  ८३ हजार १५६  गुन्हे दाखल झाले असून १६ हजार ८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

 वरील कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८० हजार ६१७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १११४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ४९,८०२वाहने जप्त करण्यात आली परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटनांची नोंद  झाली असून  यात ६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २१पोलीस अधिकारी व १३४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. त्यापैकी ५ पोलीस अधिकारी व ६ कर्मचारी कोरोना  मुक्त झाले असून उरलेल्या १६ पोलीस अधिकारी व १२५ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Previous articleमोठा निर्णय : लॉकडऊनमुळे अडकलेल्या कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना घरी जाता येणार
Next articleचिंताजनक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ९९१५ वर पोहचली