बापरे…दोन दिवसांत तब्बल ६२ कोटींची दारू खपली

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील काही भागात काही अटी शर्तीसह दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील ९ जिल्हे वगळता दोनच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या दारू दुकानातून तब्बल ६२ कोटी ५५ लाखांची दारू विक्री झाल्याचे पुढे आले आहे.

राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या काळात परवापासून गडचिरोली,वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा वगळता इतर ठिकाणी सीलबंद दारू विक्री करण्यास परवानगी दिली आहे.मात्र केवळ दोनच दिवसांत तब्बल ६२ कोटी ५५ लाख रूपयांची दारू खपल्याची माहिती समोर आली आहे.सध्या सातारा, सोलापूर,औरंगाबाद,जालना, बीड,नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर या ठिकाणी दारू विक्रीची दुकाने सुरू करण्यात आलेली नाही.तर ठाणे, मुंबई  उस्मानाबाद,लातूर या ठिकाणी होणारी गर्दी पाहता अशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर अकोला,गोंदिया,वाशिम,यवतमाळ या ठिकाणी ही दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे.राज्यात गेल्या दोन दिवसात देशी मद्य विक्रीची, वाईन दुकाने, बीयर दुकाने, फक्त वाईन अशी एकूण ३ हजार ५४३ दारूची दुकाने सुरू आहेत.तर गेल्या दोन दिवसांत १६ लाख लिटर दारू रिचवण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

Previous articleमुंबईत आजपासून दारूची दुकाने बंद
Next articleएका दिवसात तब्बल  ४३ कोटी ७५ लाख रुपयांची दारू विक्री