मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात एकूण १० हजार ८२२ किरकोळ दारू विक्री दुकानापैकी आज ३ हजार २६१ दुकाने सुरू होती.आज दिवसभरात १३ लाख ८२ हजार लिटर दारुची विक्री झाली असून,आज एकाच दिवसांत ४८ कोटी १४ लाख रुपयांचा गल्ला जमा झाला आहे.
राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर,कोल्हापुर, सांगली, सिंधुदुर्ग, नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार,गोंदिया,अकोला,वाशिम,बुलढाणा व रत्नागिरी येथील परवानाधारक वाईन शॉप सुरू आहेत.तर सातारा, औरंगाबाद,जालना, बीड, नांदेड,परभणी, हिंगोली व नागपुर येथील वाइन शॉप बंद आहेत.मुंबई शहर, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि लातुर जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली होती परंतु मात्र ती तातडीने मागे घेण्यात आली आहे.भंडारा व अमरावती जिल्ह्यातील दारू विक्रीला लवकरच परवानगी देणार येणार आहे.राज्यात २४ मार्चपासुन लॉकडाऊन सुरु आहे.शेजारील राज्यांमधुन अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहे. ६ मे रोजी राज्यात ७३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४३ आरोपींना अटक करण्यात आली. सुमारे ९ लाख ९८ हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.२४ मार्च ते ६ मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ४,८२९ गुन्हे नोंदविण्यात आले असून २,१०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर ४३८ वाहने जप्त करण्यात आली असून १२ कोटी ६३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे उमाप यांनी सांगितले.