मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत गर्दी आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरपोच मद्यसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी ग्राहकांकडे परवाना असणे बंधनकारक आहे मात्र तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने नवीन परवाना प्राप्त करताना अडचण निर्माण झाल्याने आता या विभागाने सर्व निरिक्षक,दुय्यम निरिक्षक तसेच अधीक्षकांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने असे परवाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
घरपोच मद्यसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज दिवसभरात राज्यातील ८ हजार २६८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मात्र या प्रणालीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने असे परवाने मिळविण्यात अडचण निर्णाण होत असल्याने आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक,दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्य सेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे.एका वर्षाच्या मद्य सेवन परवान्यासाठी १०० रुपये तर आजीवन परवान्याकरिता १ हजार रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणाप आहे.