मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का मारला आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.सध्या राज्यात एकूण ४ लाख ९७ हजार ७०५ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २२ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १२ हजार ७२५ गुन्हे नोंद झाले असून २२,७५३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २२ लाख ९८ हजार ४७७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ४ लाख ९७ हजार ७०५ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.या काळात अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४ लाख १५ हजार ५९१ पास देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ६९ हजार ४३५ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १० पोलिस व १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व अशा १८ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या १३२ पोलीस अधिकारी व ९९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण १६८० रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास १ लाख १६ हजार ७१७ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉक डाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.