मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार२२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.
राज्यात ११६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:
ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३,सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ५५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत.* या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (३६,९३२), बरे झालेले रुग्ण- (१६,००८), मृत्यू- (११७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,७४५)
ठाणे: बाधीत रुग्ण- (८६३८), बरे झालेले रुग्ण- (२७२९), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७३७)
पालघर: बाधीत रुग्ण- (९१३), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१०)
रायगड: बाधीत रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५०)
नाशिक: बाधीत रुग्ण- (१०७०), बरे झालेले रुग्ण- (८१८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९२)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८)
धुळे: बाधीत रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
जळगाव: बाधीत रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२३)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
पुणे: बाधीत रुग्ण- (७२२३), बरे झालेले रुग्ण- (३४२५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४८४)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (७६९), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९३)
सातारा: बाधीत रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९८)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (८७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८८)
सांगली: बाधीत रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२१), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१४१०), बरे झालेले रुग्ण- (९५९), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८६)
जालना: बाधीत रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)
परभणी: बाधीत रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
लातूर: बाधीत रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)
बीड: बाधीत रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
नांदेड: बाधीत रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
अकोला: बाधीत रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३३)
अमरावती: बाधीत रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)
वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
नागपूर: बाधीत रुग्ण- (५११), बरे झालेले रुग्ण- (३४२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०)
वर्धा: बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
भंडारा: बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)
एकूण: बाधीत रुग्ण-(६२,२२८), बरे झालेले रुग्ण- (२६.९९७), मृत्यू- (२०९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३३,१२४)
- राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती असून २५७६ उपचार केंद्र कार्यान्वित आहेत.
- डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल २७५ आहेत. त्यात एकूण खाटा ३३ हजार ५३८ असून अतिदक्षता विभागातील ५००३ खाटा आहेत. २०२८ व्हेंटीलेटर असून २ लाख ५६ हजार ४८५ पीपीई कीटस् आहेत. तर ४ लाख ३१ हजार २१४ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.
- डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर ४४९ आहेत. त्यात एकूण खाटा २८ हजार ९२७ असून अतिदक्षता विभागातील २१३७ खाटा आहेत. ६१५ व्हेंटीलेटर असून ६४ हजार ३०८ पीपीई कीटस् आहेत तर २ लाख ११ हजार ८४७ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.
- कोविड केअर सेंटर १६४३ आहेत. त्यात एकूण खाटा २ लाख ६ हजार ४२८ असून १ लाख ५४ हजार ८६० पीपीई कीटस् आहेत. तर ३ लाख २५ हजार ९६१ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.
- वर्गवारी न केलेले २०५ उपचार केंद्र आहेत.
- २५७२ उपचार केंद्रांमध्ये २ लाख ७८ हजार ४५९ आयसोलेशन बेडस् आहेत. त्यातील अतिदक्षता विभागातील एकूण बेडस् ८५०१ आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २९४१ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ६०० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६७.६८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.