मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज आदेश जारी करून राज्यातील लॉकडाऊनच्या नियमावलीत काही बदल केले आहेत. नव्या आदेशानुसार मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे आता ठाणे,नवी मुंबई,कल्याण-डोंबिवली,बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे.
राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊन मध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूकीस बंदी केली होती यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणे शक्य नव्हते.राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या आदेशात खासगी कार्यालये काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.तसेच यामुळे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे आणि एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे. या नव्या आदेशानुसार मुंबई एमआरआर रिजनमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली असल्याने ठाणे,नवी मुंबई,कल्याण-डोंबिवली,बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करणे सुलभ झाले आहे.