एक शरद ….सगळे गारद ! ; शरद पवारांची ऐतिहासिक मुलाखत

मुंबई नगरी टीम

मुंबई: कोरोनाचे संकट आणि राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यात सुरु असलेल्या कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून तीन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. या मुलाखतीचा टीझर खा. संजय राऊत यांनी ट्विट केला असून,एक शरद ….सगळे  गारद ! असे शीर्षक देऊन या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील सत्ता बदल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील वेगळेपण आदी विषयांवर भाष्य केले आहे.ही ऐतिहासिक मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यावर असलेले कोरोनाचे संकट, तर सरकार अस्थिर करण्याच्या सुरू हालचाली आदी राजकीय पार्श्वभूमी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली असून,ती येत्या शनिवारपासून तीन भागात प्रसारीत करण्यात येणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर घेतलेल्या या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या मुलाखतीचा काही महत्वाचा भाग राऊत यांनी ट्विट करीत प्रसिद्ध केला आहे.कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांपेक्षा पवारांची असलेली वेगळी भूमिका,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील वेगळेपण तसेच राम मंदिर आंदोलनासारख्या संवेदनशील विषयावरही पवार यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला राज्यातील जनतेने कौल दिला असतानाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवून किंगमेकर ठरलेले पवार यांना या घडामोडीवरही राऊत यांनी प्रश्न विचारले आहेत.

शरद पवार यांची ही मुलाखत मुलाखत ऐतिहासिक ठरेल.अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत.असे राऊत यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील सत्ता बदल हा एक अपघात होता काय? याबाबत शरद पवार यांनी काय भूमिका मांडली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही मुलाखत येत्या ११, १२ आणि १३ जुलै रोजी प्रसारीत करण्यात येणार आहे.

Previous articleआता दुकाने आणि मार्केट सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार
Next articleराष्ट्रवादीत प्रवेश केलेले पारनेरचे ५ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत