मुंबई नगरी टीम
मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधान हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारचे आहे.सरकार म्हणून जी जबाबदारी जनतेमध्ये जाऊन व सुख-दु:ख समजून त्याचे नियोजन करणे व आढावा घेणे व त्यावर उपाययोजना करणे असते ते करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सरकारचा कारभार सुरु आहे.अश्या वेळी विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी जाऊन जर रुग्णांची दुख समजून घेत असतील व तेथील रुग्णालयांची व्यवस्था पाहत असतील तसेच तेथील व्यवस्था करण्यासाठी मदत होत असेल तर त्यावर अशा प्रकारे टिका-टिप्पणी करणे, म्हणजे महाराष्ट्रातील जनता ज्यापध्दतीने देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कोविडच्या परिस्थितीची आढावा घेत आहे,त्याचे कौतुक करित असताना त्यावर पोटशूळ उठले आहे.त्या उद्विगनेतून अशा प्रकारची भूमिका पर्यटनमंत्र्यांना स्पष्ट करावीशी वाटत आहे. असे सडेतोड प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिले आहे.
पर्यटनमंत्र्यांना आवाहन करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या, रुग्णालयांमध्ये जाऊन या, तेथील कोविड रुग्णांची भेट घ्या,म्हणजे आपली संवेदनशीलता दिसून येईल. केवळ ठाणे महापालिकेला गेले व सर्व आयुक्तांना भेटून एक तासाची बैठक घेऊन नीट माहिती मिळत नाही व योग्य उपाययोजनाही होत नाहीत. त्यामुळे जर ख-या अर्थाने उपाययोजना होत असत्या तर २ लाखांच्या वर रुग्णांची संख्या गेली नसती व १० हजार रुग्ण मृत पावले नसते, त्यामुळे आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सुख दु:ख नाही त्यामुळे केवळ हे अपयश झाकण्यासाठी अश्या प्रकारचे विरोधकांवर टिका करण्याचे काम येथे होत आहे. आपण इथे अनेक उदाहरणे देऊ शकतो, ठाण्यामध्ये गायकवाड नावाची मृत पावलेली व्यक्ती सोनावणे समजून सोनावणे कुटुंबियांच्या ताब्यात त्यांचे पार्थिव दिले व त्यांचे अंत्यविधी झाले व आम्ही दौ-यावर गेलो असताना तेथे त्यांचे नातेवाईक आम्हाला भेटायला आले व आमच्या रुग्णांचा ठावठिकाणा कळत नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली, त्यानंतर दोन दिवसांनी ही खली माहिती उघड झाली. दुदैर्वाने सोनावणे मृत पावले. असा या सरकारचा कारभार सुरु आहे आणि सरकारच्या या बेजबाबदार कारभाराची लक्तरे विरोधकांनी वेशीवर टांगली त्यामुळेच त्यांना दुख होत आहे, त्यामुळेच अश्या टुरिझमच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. दोन वेळा मी क्वारांटाईन झालो, दोन वेळा कोविडचे टेस्टिंग करुन घेतले पण त्यामुळे घाबरुन आम्ही आमचे दौरे रद्द केले नाहीत व लोकांच्या दारात जाणे थांबविले नाही सरकार आपल्या घरात आणि विरोधी पक्ष नेते लोकांच्या दारात याचाच पोटशूळ त्यांना होतोय असा टोलाही दरेकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लगाविला.