उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका,लॉकडाऊन वाढवू नका : प्रकाश आंबेडकर

मुंबई नगरी टीम

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे.त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही,ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील.त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका,अस ही मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.भारतात ४० टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे शासनाला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की आपण लॉकडाऊन वाढवु नका, असेही शेवटी  आंबेडकर म्हणाले.

Previous article१७ हजार ७१५ बेरोजगारांना मिळाली नोकरी ;नोकरी इच्छूक तरुणांनो येथे नोंदणी करा
Next articleगुन्हेगारांना  कठोर शासन करा: प्रविण दरेकर