नारायण राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई :  माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे.यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे.निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली आहे.कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.राणे यांनी काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग मध्ये कोरोनाची चाचणी केली होती त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.त्यांनतर त्यांनी मुंबईत कोरोनाची चाचणी केली असता आज त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Previous articleमरता…मरता..वाचले ; खासदार नवनीत कौर राणा
Next articleअखेर पार्थ पवार यांच्या नाराजी नाट्यावर पडदा !