मरता…मरता..वाचले ; खासदार नवनीत कौर राणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू असून,त्यांनी आज एक व्हिडीओ समाज माध्यमात शेअर करून आपण या आजारातून मरता मरता वाचले असल्याचे सांगितले आहे.माझी प्रकृती आता स्थिर असून आज मला आयसीयू मधून सामान्य कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी या व्हिडीओतून दिली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर नागपूर मधील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल  त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला आणण्यात आले असून,त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत आज थोडी सुधारणा झाल्याने त्यांना सामान्य कक्षात स्थलांतरीत करण्यात आले आहे,आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे,आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे,मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार…असा संदेश देणारा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमावर शेअर केला आहे. या आजारातून मी मरता मरता वाचले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर  मात करू अशी मला आशा आहे अशी पोस्ट त्यांनी समाज माध्यमात शेअर केली आहे. खासदार नवनीत कौर राणा यांच्या मुलाला,मुलीला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबाची काळजी घेत असतानाच त्यांनाही कोरोनाची लागण झाली.त्यांनी आज शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधला.माझ्या प्रकृतीची कोणीही चिंता करू नये,मी केलेली चांगली कामे आणि आपले आशिर्वाद यामुळेच मी मरता मरता वाचले आहे.मी परत जोमाने आपली सेवा करण्यासाठी आपल्यात येईल असे सांगतानाच त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Previous articleजिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांना क्वारंटाईन करा!
Next articleनारायण राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण