फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची ‘डरकाळी’ नागपुरात भाजपाशी दोन हात करणार

मुंबई नगरी टीम

नागपूर । मनसेचे अध्यक्ष राजस ठाकरे हे विदर्भाच्या दौ-यावर असून त्यांनी आज नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी आव्हान दिले आहे.नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे.प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठे होता येत नाही.त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील असा विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौ-यावर असून,आज नागपूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यावर भाष्य केले.यावेळी त्यांनी सध्या वेदांता फॉस्ककॉन प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर मत व्यक्त केले.राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा ? असा सवाल करत नेमके कुठं फिस्कटले याची चौकशी व्हावी,तसेच या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.विदर्भ आमच्यासाठी महाराष्ट्राचा एक भाग असल्याचे सांगून त्यांनी वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली.मनसेची स्थापना होवून १६ वर्षे झाली तरी विदर्भात पक्षाचे अस्तित्व नाही.ज्या गतीने पक्ष विस्तार व्हायला हवा होता तसा विस्तार झाला नाही.असेही सांगून विदर्भात अनेक तरुण-तरुणी संधी देण्यासाठी नागपुरातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त करीत असल्याची घोषणा त्यांनी करून घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले.नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे.प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठे होता येत नाही.त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous articleशिंदे सरकार केव्हा कोसळणार ? जयंतराव पाटलांनी सांगितला थेट मुहूर्त
Next articlePWD मंत्र्यांचा दणका : बदलीसाठी दबाव आणणा-या अधिकारी,कर्मचा-यांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई