मुंबई नगरी टीम
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार,असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी सरकावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र सरकारने परीक्षा न घेण्याची मागणी केली होती. पंरतु ती फेटाळात न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली. या अनुषंगाने अमृता यांच्या ट्विटमुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. सुशांतसिंह राजपूत तपासावरून त्यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत होते.त्यानंतर त्यांनी परीक्षा घेण्याच्या निकालावरून सरकारवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “किसी की साथ गलत करके अपनी बारी का इंतजार जरूर करना!! ईश्वर की ‘न्याय की चक्की’ थोडी धीमी जरूर चलती है, पर ‘पिस्ती’ बहुत बारीक है!”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. अर्थात यात त्यांनी कोणाला टॅग केले नाही किंवा कोणाचा उल्लेख केला नाही. पंरतु नुकताच आलेला अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल आणि ठाकरे सरकारची फेटाळलेली मागणी त्यात अमृता फडणवीस यांच्या ट्विटने चर्चेसाठी नवा मुद्दा अनेकांना दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी हा एक प्रकारचा टोला असल्याची चर्चा रंगली आहे. या आधी देखील अमृता यांच्या अनेक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांचा राजकारणाशी थेट संबंध येत नसला तरी त्यांचे ट्विट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर राज्य सरकार सातत्याने परिक्षांबाबत एकतर्फी निर्णय घेत होते, अशी टीका त्यांनी केली. तसेच न्यायालयाचा हा निर्णय योग्य असल्याचे फडणवीस म्हणाले.