३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

मुंबई नगरी टीम

दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या अनलॉक ३ ची मुदत उद्या संपत असल्याने गृह मंत्रालयाने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.त्यानुसार लॉकडाऊन येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे.प्रतिबंधित क्षेत्रात लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.तर राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

केंद्र सरकारने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अधिक व्यवहार खुले केले आहेत.तर प्रतिबंधित क्षेत्रात ३० सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.मेट्रो रेल्वे सेवा येत्या ७ सप्टेंबर  पासून श्रेणीबद्ध पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली जाणार आहे.२१ सप्टेंबर पासून सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा,करमणूक ,सांस्कृतिक,धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर स्नेहसंमेलनाला १०० जणांच्या कमाल मर्यादेसह परवानगी दिली जाईल.अशा मर्यादित संख्येच्या कार्यक्रमांमध्ये देखील फेस मास्क घालणे,शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंगची तरतूद आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझर व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

२१ सप्टेंबर पासून खुल्या प्रेक्षगृहांना (ओपन एअर थिएटरला)  उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे.मात्र शाळा,महाविद्यालये,शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था येत्या ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. ऑनलाईन,दूरस्थ शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. राज्ये,केंद्र शासित प्रदेश ५० टक्के पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचा-यांना एकाच वेळी ऑनलाईन शिकवणी,दूरध्वनी-सल्लामसलत आणि संबंधित कामांसाठी शाळांमध्ये बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ९ वी  ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याकरिता त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे.राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.

खालील बाबींशिवाय,इतर कृतींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर परवानगी देण्यात आली आहे:

सिनेमागृहे,तरण तलाव,मनोरंजन पार्कस,थिएटर्स (खुले थिएटर सोडून) आणि यासारखी ठिकाणे.आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रवास, केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेली असेल तर.टाळेबंदी सुरु असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये याचे ३० सप्टेंबर  पर्यंत काटेकोर पालन  करणे आवश्यक आहे.राज्य,केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर, केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही स्थानिक टाळेबंदी (राज्य,जिल्हा,उप-विभाग,शहर, गाव पातळीवर) लागू करता येणार नाही.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य वाहतुकीवर निर्बंध नाहीत.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

Previous articleकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ; आजच्या दिवसात १६ हजार ८६७ नवीन रुग्ण
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस सेल्फीचा तो “स्तुत्य उपक्रम” का राबवत नाही ? भाजपाचा टोला