मुंबई नगरी टीम
मुंबई : नेहमी पांढ-या कुर्त्यामध्ये दिसणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नव्या लूकमुळे समाज माध्यमांमध्ये दिवसभर चांगलेच चर्चेत राहिले.लॉकडाऊनमुळे अनेक नेत्यांनी आपले लूक बदलले आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नव्या लूक मधील फोटो आज चांगलाच व्हायरल झाला आहे.

पांढरा शुभ्र कुर्ता आणि हातात रूमाल घेवून प्रभावी भाषण करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लॉकडाऊन लूक मधील एक फोटो आज दिवसभर समाज माध्यमात धुमाकूळ घालत आहे.अनेक तरूणांनी आणि मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांचा फोटो लाईक करत मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे.राज ठाकरे यांच्या या लूकची महाराष्ट्रातील तरुणांमध्ये चांगलीच चर्चा आहे.आज व्हायरल झालेल्या फोटोत ते जिन्स आणि टि शर्टमध्ये दिसत आहेत.त्यांनी दाढीही वाढवल्याचे या फोटोत दिसत आहे.राज ठाकरे नेहमी चपला वापरतात मात्र या फोटोत त्यांनी चक्क स्पोर्टस शुज घातल्याचे दिसते. राज्यातील तरूणांमध्ये लोकप्रिय असणारे राज ठाकरे यांचा नवा लूक तरूणांना चांगलाच भावला आहे.त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या या लॉकडाऊन लूकची दिवसभर चर्चा आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात सर्वच सुविधा बंद असल्याने राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपले लूक बदलले आहेत.काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या नव्या लूकची चर्चा होती तर आज दिवसभर राज ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या लूकची चर्चा आहे.

















