३० सप्टेंबरपर्यंत शाळा,महाविद्यालये बंद मग परीक्षांचा आग्रह का ? : उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : परीक्षांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली. परीक्षा केव्हा आणि कोणत्या  पद्धतीने घेतल्या जाव्यात या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल उद्या सोमवारी प्राप्त होणार असून,राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परिक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला त्यांनतर सामंत यांनी आज पुन्हा परीक्षाबाबत कुलगुरूंची बैठक घेवून चर्चा केली.परीक्षा केव्हा आणि कशा पध्दतीने घ्यायच्या याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.पेडणेकर समितीचा अहवाल उद्या प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चाकरून परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.आजच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जाव्यात,या परीक्षा कशा घेतल्या जाव्यात,ऑनलाइन की ऑफलाइन,ओपन बुक यावर चर्चा या बैठकीत करण्यात आली.परीक्षा सरळ साध्या सोप्या पद्धतीने कशी घेतली जाईल यावरही मते मांडण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेण्यासाठी साधारणपणे ४० ते ६० दिवस तयारीला लागत असल्याने तसा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिला जाणार असून विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारने काल जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.३० सप्टेंबरपर्यंत शाळा,महाविद्यालये बंद राहणार आहेत मग परीक्षांचा आग्रह का ? परीक्षा कशा घ्यायच्या असे सांगतानाच,विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या भूमिकेत फरक का ? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आज झालेल्या मोदींच्या मन की बातमध्ये परीक्षांचा विषय आला पाहिजे होता असेही सामंत म्हणाले.

Previous articleमोदींच्या बायोपीकसाठी गुजरात भाजपचा पैसा ? काँग्रेसचा आरोप
Next articleराज ठाकरेंचा लॉकडाऊन “लूक” बघितला का ? फोटो होतोय जबरदस्त व्हायरल