मुंबई नगरी टीम
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा राजकारणाशी काही संबंध नसतानाही त्या राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. यावेळी देखील त्यांनी यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. अभिनेत्री कंगना रणावत म्हणजे नॉटी गर्ल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर अमृता फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
“आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत”, असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा संजय राऊतांकडे असल्याचे स्पष्ट होते.संजय राऊत यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.या मुलाखतीत त्यांनी कंगनासाठी वापरलेल्या हरामखोर शब्दाचा अर्थ उलगडून सांगितला. मराठीमध्ये हरामखोर म्हणजे बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ आणि बेईमान मुलगी आहे, असे मला वाटते, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले होते. यावरूनच अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
याधीही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेने कंगनाविरोधात केलेल्या जोडे मारो आंदोलनाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे अमृता फडणवीस यांना कंगनाचा एवढा पुळका का ?, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.सध्या संजय राऊत विरुद्ध कंगना असा शाब्दिक वाद पाहायला मिळत असून. रोज त्यावर टीका टिपण्णी केल्या जात आहेत.