अमृता फडणवीस यांचा वेस्टर्न लूक; नव्या वर्षातील नवे गाणे चर्चेत,फेसबुकवर प्रतिक्रियांचा पाऊस

??????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

मुंबई नगरी टीम

मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच समाज माध्यमात सक्रिय असतात.सामाजिक उपक्रम आणि त्यांना आवड असलेल्या गाण्यांची माहिती त्या नेहमीच समाज माध्यमातून शेअर करीत असतात.नव्या वर्षात त्यांचे एक नवे गाणे येत असून,त्याची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली आहे.’अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे !! हे त्यांचे नवीन गाणं येत असून फेसबुकवरील त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

अमृता फडणवीस यांनी केल्या काही वर्षात संगीतक्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्या आपल्या नव्या गाण्याची माहिती समाज माध्यमातून देत असतात.नव्या वर्षात त्यांचे एक नविन गाणे येत असून,त्याची माहिती त्यांनी समाज माध्यमातून दिली आहे.अमृता फडणवीस यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट शेअर करीत नव्या गाण्याची माहिती दिली आहे.’अज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !! हे त्यांचे नवीन गाणं येत आहे.या गाण्याचे बोल देतानाच त्यांनी त्यांचा एक फोटोही शेअर केला आहे.त्यांचा वेस्टर्न लूक मधिल फोटो चांगलाच चर्चेत आहे.त्यांनी परिधान केलेले दागिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.त्यांनी समाज माध्यमात शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचेही चित्र आहे.या मध्ये काहींनी त्यांच्या नव्या गाण्याचे स्वागत केल्याचे चित्र आहे तर काहींनी त्यांच्या या नव्या लूकवर टीकाही केल्याचे पाहवयास मिळत आहे.

Previous articleमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत ; सत्तार यांची मंत्रीपदावरून हाकालपट्टी करा
Next articleगोळवलकर आणि सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेले अवमानकारक वाक्य भाजपला मान्य आहे का ?