राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित कर दरात अनुक्रमे २ आणि १ रुपयांची घट

सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा – सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई दि.10 राज्यात  पेट्रोल वरील मूल्यवर्धित कर दरात २ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील कर दरात १ रुपया प्रति लिटर घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून कमी झालेले दर दि. ११ ऑक्टोबर २०१७ पासून अंमलात येतील अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्र शासनापाठोपाठ राज्य शासनाने सर्व सामान्य ग्राहकांना दिलासा देणारा हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, केंद्र शासनाने दि. ४ ऑक्टोबर २०१७ पासून पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात २ रुपये प्रति लिटर घट केली या घटीमुळे राज्य शासनास मुल्यवर्धित करात साधारणत: १०५२ कोटी रुपयांची प्रति वर्ष महसूल हानी होणार आहे.

आता राज्य शासनाने पेट्रोल वरील मूल्यवर्धित कर २ रुपये प्रति लिटर कमी केल्याने ९४० कोटी व डिझेलवर मूल्यवर्धित कर १ रुपये प्रति लिटर कमी केल्याने १०७५ कोटी रुपयांची घट होणार आहे. ही एकत्रित महसूल हानी २०१५ कोटी रुपयांची आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीच्या निर्णयामुळें राज्याच्या एकत्रित महसूलात ३०६७ कोटी रुपयांची वार्षिक घट होणार आहे.

आजच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल चे दर किमान दोन रुपयांनी तर डिझेलचे दर किमान एक रुपयांनी कमी होतील अशी माहिती ही त्यांनी दिली.

Previous articleवर्षभरात 80 हजार 729 कृषी पंपांना वीज जोडणी देणार
Next articleभाजपाचा केवळ ८१३ ग्रामपंचायतीवर विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here