महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : माझी जात ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जाते,असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात जात हा महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही.तर महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवले होते,असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

यावर अधिक बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही. महाराष्ट्रात दलित, मुस्लिम मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, अशी आठवण संजय राऊतांनी यावेळी करून दिली. तर महाराष्ट्रात जात हा विषय कधीच महत्त्वाचा राहिलेला नाही, अशी स्पष्टोक्ती संजय राऊत यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जातीचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

 देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका, असा सिद्धांत आहे. आणि कसेही करून हे मागच्या सरकारच्या माथी कसे मारायचे.दुर्दैवाने, मी स्पष्ट बोलत आहे की, काही बोटावर मोजण्या इतकी अशी काही लोक आहेत. ज्यांना असे वाटते की, माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माथी सर्व मारले तर चालते. असा प्रयत्न काही लोक करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सगळ्या लोकांना हे माहिती आहे की, समाजाच्या हिताकरिता मी काय केले आहे. त्यामुळे अशा बातम्या पसरवण्याचे जे काम करतात ते यशस्वी होणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक मुद्यावरून राजकारण करू नका : उद्धव ठाकरे
Next articleमहाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण