डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक मुद्यावरून राजकारण करू नका : उद्धव ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : इंदू मिल मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा पायाभरणी  कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता.मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून सुरू झालेल्या राजकारणामुळे हा कार्यक्रम अखेर पुढे ढकलावा लागला तर या मुद्द्यावरून राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दादर येथील इंदू मिल मधील जागेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार होते.तर काँग्रेसच्या नेत्यांना या कार्यक्रमाची कसलीही कल्पना नव्हती.यावरून नाराजीचा सूर सुरू होताच अखेर हा पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याक आला आहे. इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारकउभे करण्याची सर्वांची इच्छा आहे यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे. आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत.त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध
Next articleमहाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले