मुंबई अग्निशमन दलातील २५ टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई अग्निशमन दलात नवीन भरतीसाठी महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून आता लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुंबई अग्निशमन दलात २५ टक्के पदे रिक्त असून,नवीन भरतीसाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून रिक्त पदाची माहिती समोर आणत याबाबतीत  ६ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार केली होती. मुंबई अग्निशमन दलाने अनिल गलगली यांस कळविले आहे की मुंबई महापालिकेने ३० सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे रिक्त पदे भरता आलेली नव्हती. ९ सप्टेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यात मान्यता दिली आहे.

आजच्या घडीला मुंबई अग्निशमन दलात २५ टक्के पदे रिक्त असून यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी व्यक्तिशः प्राधान्य दिले आहे. मुंबई  अग्निशमन दल ही अत्यावश्यक सेवा असून रिक्त पदे भरल्यानंतर कामकाजास वेग येईल, अशी प्रतिक्रिया गलगली यांनी दिली.

Previous articleहवं तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू,ठाकरे सरकार मधील राज्यमंत्र्यांचे मोठे विधान
Next articleभाजपच्या राज्यात दलित,अल्पसंख्याक आणि महिलांवरील अत्याचारात वाढ