जनतेने दिलेला कौल आम्ही स्विकारतो, निकालाचे आत्मपरिक्षण करू

जनतेने दिलेला कौल आम्ही स्विकारतो, निकालाचे आत्मपरिक्षण करू  संभाजी पाटील निलंगेकर

नांदेड: १२ नांदेड-वाघाळा महापालिकेत जनतेने दिलेला कौल आम्ही स्विकारतो. निकालाचे आम्ही आत्मपरिक्षण करूच, मात्र निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. निवडणुकीत हार किंवा जीत होत असतेच, मात्र ईव्हीएम मशिनमुळे आमचा पराभव झाला, असे हास्यास्पद दावे आम्ही करणार नाही. कारण निवडणुकीतील विजय हा जर तुमचा विजय असेल, तर निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारणेही आपले कर्तव्य ठरते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या निर्णयाचे विश्लेषण करताना मा. कामगार मंत्री म्हणाले की, नांदेडमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला, तरीही २०१२ च्या महापालिका निवडणुका आणि २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीच्या तुलनेत आमची टक्केवारी वाढली आहे. पुर्वीच्या निवडणुकांमध्ये आम्हाला नांदेड शहरात तीन टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. प्रचारात आमच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली म्हणूनच या निवडणूकीत आम्हाला एकवीस टक्क्यांच्या आसपास मते मिळवली आहेत, असे ते म्हणाले. वरिष्ठ नेत्यांनीही आम्हाला प्रचारात खुपच सहकार्य केले, त्या सर्वांचे मी व्यक्तीश: आभार मानतो, असेही ते म्हणाले.

Previous articleयेवोन सिन यांनी घेतली डॉ. रणजित पाटील यांची भेट
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here