मंत्री धनंजय मुंडे रूग्णालयात दाखल; लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल!

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनावर यशस्वी मात केलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मागील काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना आज मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.माझी प्रकृती स्थिर असून,उपचार घेऊन लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल असे भावनिक आवाहन मुंडे यांनी केले आहे.

कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेत दाखल झालेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीमुळे मी त्रस्त आहे.त्यामुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालो आहे. माझी प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल असे भावनिक आवाहन मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई आणि बीड जिल्ह्यात आढावा घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.मुंबईतील रूग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केल्यानंतर मंत्रालयात आणि बीड जिल्ह्यात त्यांचा कामाचा झपाटा पुन्हा सुरू झाला होता.मात्र त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous articleहिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार
Next articleकोरोनावर मात केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ‘बॅक इन ॲक्शन मोड’