मुंबई नगरी टीम
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने आज बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे निदर्शने करण्यात आली. विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. वन जमिनीवर होत असलेले घोटाळे,वन रक्षक आणि वन अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारासंदर्भातील प्रश्नांची चौकशी करण्याची आमची मागणी आहे.या विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल असेही प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दत्तक घेतलेल्या वन्यप्राणी भीम पँथर यांच्या निधनास डॉ. पेठे कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांची नॅशनल पार्क मधून बदली करण्यात यावी. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत वनरक्षक, वनपाल आणि वन परिश्रेत अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी यांचे हितसंबंध येथील कंत्राटदारांशी जुळलेल असून प्रत्येक कामात गैरव्यवहार होत आहेत, त्यामुळे त्यांचीही अन्यत्र बदल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आज करण्यात आली आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या या रास्त आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तसेच नॅशनल पार्कमध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत,त्यांची चौकशी करण्याची आपण मागणी करणार असल्याचे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.
शैलेश देवरे सुमारे १८ वर्षांपासून नॅशनल पार्क मध्ये कार्यरत असून त्यांनी वन परिश्रेत्र या पदावर असताना तसेच वनपाल मालाड येथे असताना केलेल्या सर्व कामांची तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आज करण्यात आली. या निर्दशनाच्या वेळी रिपाई युवक मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड, तालुका अध्यक्ष अशोक कांबळे, जगदिश झाल्टे, अनिल कोकणे, हरिभाऊ कोंडे, सुनिल गमरे,संदिप शिंदे, रमेश पाईकराव, संजय बोर्डे, संजय वानखेडे, रवि सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.