मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई नगरी टीम

पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खडक पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे.येरवडा कारागृहात त्या व्यक्तीची रवानगी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांना अज्ञात व्यतीने फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी रुपाली पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटील या घरी असताना त्यांना तीनदा त्या व्यक्तीने फोने केला होता. तू जिथे दिसशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस, अशी धमकी त्याने दिली होती. रुपाली पाटील यांच्या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. मोबाईल क्रमांकावरून माग काढून त्याला अटक करण्यात आली आहे.त्याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक होत आहे.पुण्यातही पदवीधर निवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये चुरस रंगली आहे.या मतदारसंघातून भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड,तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेकजण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Previous articleलस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे !
Next articleमुख्यमंत्री ठाकरे यांची वक्तव्य राज्यासाठी चिंताजनक : प्रविण दरेकर