मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतांना शरद पवारांना यात गोवणे हे राजकीय षड्यंत्र

मुंबई नगरी टीम

नाशिक : मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असतांना नाशिक मधील काही कार्यकर्त्यांकडून बैठक घेत थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील निवास्थानी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला जात आहे. मुळात आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असतांना शरद पवार यांना यात गोवणे हे राजकीय षड्यंत्र आहे अशी टीका नाशिक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सद्या न्यायालयात प्रलंबित असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असून महाविकास आघाडी सरकारच्या वतीने न्यायलयात पाठपुरावा करण्यात येत आहे. असे असतांना महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना कुठल्या न कुठल्या प्रकारे बदनाम करण्याचे षड्यंत्र काही कार्यकर्त्यांकडून होत आहे. यासाठी त्यांना भाजपचा छुपा पाठींबा असून भाजप काही कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी फूस लावत असल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वतः शरद पवार लक्ष घालत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मराठा आरक्षण देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. असे असतांना देखील काही कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकार व पवार यांना नाहक बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे समाजातील ज्येष्ठ नेत्याबद्दल त्याच समाजात दुही निर्माण करणे हे चुकीचे असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Previous articleमहाविकास आघाडी सरकार वर्षभरात सपशेल अपयशी : प्रविण दरेकर
Next articleठाकरे सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी; मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पसंती