पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल : शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात खूप चांगले काम केले आहे. राज्यातील सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ झाले आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे सरकार पडणार अशी चर्चा सुरू झाली मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारने चांगले काम केले आहे.राज्यात कोरोनाचे संकट असताना त्यांनी महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने सांभाळला. आता या सरकारच्या वर्षपूर्तीनंतर चिकित्सा जास्त केली जाते आहे.कारण महाराष्ट्रात झालेला हा पहिला वहिला प्रयोग आहे. पाच वर्षे सरकार चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? असे सांगत हे सरकार पुढची अनेक वर्षे चालेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले मात्र महाराष्ट्र थांबला नाही.या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अतिशय चांगले काम केले अशी स्तुती पवार यांनी केली.खरंतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नव्हता.महाविकास आघाडी सरकार स्थापन जाले तेव्हा हे सगळं त्यांना कसं जमेल अशा दबक्या आवाजात चर्चा सुरु असतानाच त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही असेही पवार यांनी यावेळी सांगितले.राज्यात विविध प्रयोग करून झालेली तीन सरकार पाहिली.त्यावेळी सर्वात पहिली जबाबदारी माज्यावर होती.१९७८ मध्ये झालेला तो प्रयोग हा तसा सोपा राजकीय प्रयोग होता.त्यामध्ये असणा-या मोजक्या लोकांना प्रशासनाचा प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांकडून त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. ते अत्यंत संतुष्ट असायचे, त्यामुळे ते राज्य चालवणे तितकेसे कठीण नव्हते.त्यानंतर आणखी एक असेच एक सरकार येऊन गेले. मात्र त्या सरकारच्या मागे बाळासाहेब ठाकरेंसारखे खंबीर नेतृत्त्व ठामपणे होते म्हणून ते सरकार चालले. बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शक म्हणून उत्तम काम केले त्यामुळे युती सरकारला कोणतीही अडचण आली नाही असेही पवार यांनी सांगितले.

Previous articleशिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती : मुख्यमंत्री
Next article…तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही : अजित पवार