खळबळजनक : महिलेने मंत्री धनंजय मुंडेंवर केला बलात्काराचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकार मधिल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला केला.रेणू शर्मा यांनी समाज माध्यमात पोलिसात तक्रार केल्याचा अर्ज शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.रेणू शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्त,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेने केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.त्यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीचे पत्र समाज माध्यमात शेअर केले आहे.या महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय पंडितराव मुंडे यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार करून व्हिडिओ काढल्याचा आणि अनैसर्गिक संभोग केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल केली आहे.याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.रेणू शर्मा या धनंजय मुंडे यांच्या मेव्हणी आहेत.बायको बाळांतपणासाठी माहेरी गेली असताना बलात्कार करून व्हिडिओ काढला आणि नंतर सतत बलात्कार करत गेले असा आरोप शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.त्यांनी आपल्या तक्रारीत मुंडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे.

मुंडे हे मला वारंवार फोन करून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत,असेही शर्मा यांनी या तक्रारीत म्हटले आहे.तुला चांगली गायिका बनायचे असेल तर मी मोठ मोठे निर्माते आणि दिग्दर्शक यांची भेट करून देवून तुला संधी देतो असेही मुंडे म्हणत असल्याचे शर्मा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.असे आमिष दाखवत मुंडे माझ्यावर वारंवार माझ्या इच्छेविरोधात माझ्याशी शाररिक संबंध ठेवत आणि माझे शोषण करीत असा दावा या तक्रारीत केला आहे.जेव्हा माझी बहिण कामानिमित्त बाहेर जात असे तेव्हा मुंडे हे जबरदस्तीने शाररिक संबंध ठेवण्याची मागणी करत अशीही तक्रार शर्मा यांनी केली आहे.रेणू शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्त,मुंबई पोलीस,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.
 

Previous articleरेणू शर्मा यांचे आरोप पूर्णपणे खोटे,बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे
Next articleधनंजय मुंडेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण