आम्हीही याच देशातील आहोत,ओबीसींची जनगणना करा : पंकजा मुंडेंची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : आम्हीही याच देशातील आहोत,आमचीही जनगणना करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य असल्याचे ट्विट करत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांनी आज एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी २०१० मध्ये लोकसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे.या व्हिडीसोबत पंकजा मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत,आमचीही जनगणना करा ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे, अशी कॅप्शन लिहिली आहे. येणारी २०२१ सालची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous articleदीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय : शरद पवार
Next articleमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु