महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियमाची अधिसूचना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या अधिसूचनेनुसार सर्व महसूली विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरण्यात येतील, एका महसूली विभागातील कालावधी किमान ३ वर्ष राहील. एकल पालकत्व सिध्द झालेल्या अधिकाऱ्यांना या नियमातून सूट देण्यात येणार असून,३० पेक्षा कमी पदसंख्या असणाऱ्या संवर्गांना हे नियम लागू होणार नाहीत.महसूली विभाग वाटप धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येतात. त्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय विभाग तसेच, शासकीय अधिकारी संघटनांकडून निवेदनेही देण्यात आली आहेत. त्यांचा विचार करून सध्याचा महसूल विभाग वाटप नियम २०१५ रद्द करून,नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous articleरत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी :उदय सामंतांची वचनपूर्ती
Next article“तो” अहवाल सीताराम कुंटेंनी नाही तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी तयार केला