कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा

कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा

मुंबई दि.18  राज्यातील शेतक-यांना देण्याच्या घोषणेची आज सुरूवात झाली. कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या  उपस्थिती सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी ‘आपले सरकार’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी करण्यात आली असून, सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल. दररोज 2 ते 5  लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत.

Previous articleखोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरुच
Next articleमंत्र्यांच्या बंगल्यावर विरोधकांचे काळे कंदिल