मंत्र्यांच्या बंगल्यावर विरोधकांचे काळे कंदिल

मुंबई दि.18  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  शेतकऱ्यांच्या  फसवी कर्जमाफी,राज्यातील लोड शेडिंग, राशनिग दुकानावरील साखर गायब,महिलांची असुरक्षितता,वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त करत सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे असा आरोप करत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील लावत सरकारचा निषेध केला आहे.सरकारची  दिवाळी तर सामान्यांचे दिवाळे या सरकारने काढले आहेत याची जाणीव सरकारला व्हावी यासाठी काळे कंदील लावले .

Previous articleकर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा
Next articleकाही जणांना स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसते-