मुंबई नगरी टीम
मुंबई : पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे.राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021
पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्यावर निवृत्त होईपर्यंत अशा पोलीसांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत बढती मिळते.मात्र आता पोलीस शिपाई यांना निवृत्त होईपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचता येणार आहे.पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे,यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.एखादा तरुण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला,तर निवृत्त होईपर्यंत त्याला सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत बढती मिळते.पण आता अशा पोलीसांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे,यासाठी गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे.नव्या प्रस्तावानुसार जो कोणी पोलिस दलात भरती होईल,तो निवृत्तीवेळी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचलेला असेल.