राज्यातील १४ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने आज १४ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती प्रदेश नियंत्रण प्राधिकरण येथे सचिव या पदावर करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने यांची नियुक्ती मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.तर एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी मलीकनेर यांची नियुक्ती सध्याच्या पदावरच करण्यात आली आहे.सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदी,पुणे महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव यांची नियुक्ती यशदाचे उप महासंचालक या पदी करण्यात आली आहे.कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ येथे करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याणचे सह व्यवस्थापकीय संचालक जी. एम. बोडके यांची नेमणूक अकोला महानगरपालिकेचे आयुक्तपदी करण्यात आली आहे.ठाणे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एस. जी. देशमुख यांची नियुक्ती मुंबई येथे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक या पदावर करण्यात आली आहे.एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर तर राहुल कर्डिले,यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.जी एस पापळकर यांची नियुक्ती हिंगोलीचे जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.पालघर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एन. आर. गटणे यांची नियुक्ती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

Previous articleखुशखबर : आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
Next articleमराठी टक्का कमी करू नका,कष्टाचा ठेवा विकू नका ! : शरद पवार