किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा : राष्ट्रवादीचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले असून या आरोपाचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे असेही तपासे म्हणाले. दरम्यान भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान ताबडतोब थांबवावे असा इशाराही तपासे यांनी दिला आहे.

Previous articleराज्य सरकारचा निर्णय : शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश करणार
Next articleवीजनिर्मिती केंद्रांसाठी जागा दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी घेतला मोठा निर्णय