आशा स्वयंसेविकांना १ हजार तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १२०० वाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई । आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै २०२१ या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणा-या अंदाजे १३५ कोटी ६० लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.

Previous articleकोरोनाचा धोका कमी झाल्यावर यात्रा आणि जत्रांना परवानगी
Next articleघरात,पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला