नवाब मलिक यांनी वेळ घालवण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्यावी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजकीय अर्विभाव न आणता आपल्याकडील माहिती केवळ प्रसार माध्यमांसोबत उघड करुन वेळ घालविण्यापेक्षा ती महत्त्वाची माहिती संबंधित तपास यंत्रणाकडे द्यावी, जेणेकरुन त्या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने होऊ शकेल, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.

क्रुझवरील कारवाईमध्ये १० लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी २ लोकांना सोडण्यात आले असून ज्या दोघांना सोडले, त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असल्याची सविस्तर माहिती उद्याच्या पत्रकार परिषदेत देणार असल्याचे मलिक यांनी आज जाहिर केले. त्यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, मलिक यांच्या वक्तव्यामध्ये काही तथ्य दिसत नाही. जर मलिक यांच्या दाव्यानुसार पकडण्यात आलेल्यांमध्ये जर कोणत्या पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक असेल तर एनसीबी त्या विरुध्द नक्कीच कारवाई करेल. अटक केल्यानंतर कोणाचाही अशी सुटका होत नाही. तरीही मलिक यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत जास्त वेळ घालविण्यापेक्षा त्या संबंधित तपास यंत्रणेकडे तक्रार करावी आणि त्यांना माहिती द्यावी. जेणेकरुन तपास योग्य पध्दतीने होईल व संबंधितांविरुध्द कारवाई होऊ शकेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Previous articleक्रुझवरील ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा ; उद्या भांडाफोड करणार
Next article…अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार : शरद पवारांचा इशारा