मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या एकूण ६ खासदारांची मुदत येत्या ४ जुलै २०२२ रोजी संपत आहे.यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत,काँग्रेसचे खासदार पी. चिदंबरम,राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपणा-या खासदारांमध्ये भाजपच्या ३ खासदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलेल्या एकूण ६ खासदारांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या ४ जुलै २०२२ रोजी संपत आहे.या सहा राज्यसभा सदस्यांमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत,काँग्रेसचे खासदार पी. चिदंबरम,राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल तर भाजपचे खासदार विकास महात्मे,केंद्रीयमंत्री पियुष गोयल,विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणा-या खासदारांमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेने राज्यसभेवर तीन वेळा संधी दिली आहे.तर काँग्रेसचे खासदार पी. चिदंबरम यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्याची संधी दिली होती.