शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी नंतर शशी थरुर यांचाही ‘या’ पदाचा राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.याच्या निषेधार्थ संसदेपासून रस्त्यावर विरोध प्रदर्शन सुरु असतानाच राज्यसभेतील शिवसेनेच्या निलंबित खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संसद दूरचित्रवाणीवरील सूत्रसंचालन पदाचा राजीनामा दिला असतानाच आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देखील संसद टीव्हीवरील ‘टू द पॉईंट’ नावाचा टॉक शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासदंर्भात दोघांनीही ट्विट करीत माहिती दिली आहे.

राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे एकूण १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.त्यामधील शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या कारवाईच्या निषेधार्थ संसद दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.त्यांनतर आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देखील संसद टीव्हीवरील ‘टू द पॉईंट’ नावाचा टॉक शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. थरूर यांनी यांची माहिती ट्विट करीत दिली आहे.या दोन्ही खासदारांनी पत्र लिहून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Previous articleमुंबई बँकेच्या संचालकपदी आ. प्रविण दरेकर आणि आ. प्रसाद लाड बिनविरोध
Next articleसंजय राऊत यांच्यासह ६ राज्यसभा खासदारांची मुदत जुलै मध्ये संपणार